पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी 'कव्हर ड्राइव्ह' शिकेन, तापसीनं मिताली राजला दिलं वचन

मिताली राजच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

भारताची माजी कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी महिला क्रिकेटर मिताली राजचा जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा होती. मिताली राजच्या ३७ व्या वाढदिवशी तिच्या आगामी चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणाच तापसी पन्नूने केली आहे. 'शाबाश मिथू' असे  या चित्रपटाचे नाव असून तापसी पन्नू या चित्रपटात मितालीची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं काम अंतिम टप्प्यात

तापसीने ट्विटरवरुन काही फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसीने मितालीचा वाढदिवस साजरा केल्याचे फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवरुन मितालीसोबतचे फोटो शेअर करताना तापसीने लिहलंय की,  माझ्या रुपात स्वत:चा (मितालीचा) बायोपिक पडद्यावर पाहून तुला अभिमान वाटेल. कॅप्टन मिताली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुला या क्षणी काय गिफ्ट द्यावे हे मला माहिती नाही. मी तुला काय देऊ शकते हे देखील मी सांगू शकत नाही. पण 'शाबाश मिथू' याचित्रपटात तुझी भूमिका उत्तमरित्या साकारेन, असे वचनच तापसीने मिताली राजला दिले आहे. 

फेडररची प्रतिमा आणखी उजळली, सन्मानार्थ स्विसच्या नाण्यावर कोरले चित्र

मितालीच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी 'कव्हर ड्राइव्ह' शिकण्यास तयार आहे, असा उल्लेखही तापसीने आपल्या ट्विटमध्ये केलाय. तापसीची प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करणार आहेत. मिताली राज भारताची एकमेव महिला क्रिकेटर आहे जिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात ७ शतकासह ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. तब्बल दोन दशकांपासून ती भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: shabash mithu announced on mithali rajs birthday says tapasi im ready to learn cover drive