पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US OPEN 2019: महिला एकेरीत युवा जोश अन् अनुभवी होश यांच्यात फायनल

सेरेना विरुद्ध बियांका

अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विलियम्सने यूएस ओपनच्या उपांत्यफेरीत युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली. सेरेना दहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. अंतिम फेरीत तिच्यासमोर कॅनडाच्या १९ वर्षीय बियांका एंड्रेस्क्यूचे आव्हान असणार आहे. ऐतिहासिक विजयाच्या इराद्याने कोर्टवर उतरणाऱ्या सेरेनाला १९ वर्षांची बियांका कसे आव्हान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सेहवाग म्हणतो, जर सचिनची कॉपी केली असती तर...

जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या बियांकाने उपांत्य सामन्यात १२ व्या स्थानावर असलेल्या बेलिंडा बेनकिक ला ७-६, (७-३), ७-५ असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. बियांका यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिली कॅनेडीयन महिला आहे. बियांकाचा युवा जोश आणि सेरेनाचा अनुभव यात कोण भारी पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.