बॉक्सिंगच्या रिंगमधील आपल्या कामगिरीने जगभरात प्रसिद्ध असलेल्या माइक टायसनने २३ वेळा गँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या सेरेना विल्यम्सच्या दहशतीत राहतो, अशी कबूलीच त्याने दिली आहे. सेरेनाविरुद्ध रिंगमध्ये दोन हात करण्याची मला खूप भीती वाटते, असा उल्लेख करत त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केलाय. मी या गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) सेरेना विल्यम्सविरुद्ध रिंगमध्ये भिडण्याचा विचारही कधीच करणार नाही, या कॅप्शनसह माइक टायसनने इन्टाग्रामवर फोटो शेअर केलाय.
तुला मानलं रे ठाकूर! विराटकडून शार्दुलचं मराठीतून कौतुक
सध्याच्या घडीला सेरेना विल्यम्स आगामी वर्षातील पहिल्या गँडस्लॅमची म्हणजेत ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी करत आहे. या स्पर्धेतील फिटनेससाठी तिने बॉक्सिंगवर अधिक भर देताना दिसते. सेरेना चक्क टायसनच्या साथीने बॉक्सिंगचा सराव करत आहे. टायसनने सेरेनासोबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये सेरेना रिंगमध्ये सराव करताना दिसत आहे. टायसन सेरेनाला बॉक्सिंग सरावामध्ये मार्गदर्शन करताना दिसते. सेरेना ज्यापद्धतीने प्रहार करताना दिसते त्यामुळेच मला तिच्या विरुद्ध रिंगणार भिडण्याची भीती वाटते, असे टायसनने म्हटले आहे.
Future GOAT 15 year old WTA @CocoGauff Awesome example of kindness, courage and tenacity. Look out for what she does in 2020 pic.twitter.com/8rIqnarsAB
— Mike Tyson (@MikeTyson) December 19, 2019
INDvsWI: होपला तंबूत धाडत शमीनं घातली विक्रमाला गवसणी
यंदाच्या वर्षातील अखेरच्या अमेरिकन ओपनच्या ग्रँडस्लॅमस्पर्धेत सेरेना विल्यम्सला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कॅनडाच्या १९ वर्षीय बियांका आंद्रेस्कूने तिला पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे ३७ वर्षीय सेरेनाचे मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी साधण्याची संधी हुकली होती. आगामी वर्षातील पहिल्या ग्रँडस्लममध्ये हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सेरेना उत्सुक असेल. महिला एकेरीमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याच्या इराद्यानेच ती मैदानात उतरेल. यासाठीच ती अतोनात मेहनत घेताना दिसते.