पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US OPEN 2019: सेरेनाच्या सुंदर खेळीसमोर रशियन सुंदरी पुन्हा हतबल

सेरेना-शारापोव्हा

US OPEN 2019:  कारकिर्दीतील २४ वे ग्रँडस्लॅम मिळवण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने रशियन मारिया शारोपोव्हाला एकतर्फी पराभूत करत विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीमध्ये नोव्हाक जोकोव्हिच आणि रोजर फेडरर यांनी देखील आगेकूच केली आहे. 

महिला एकेरीमध्ये ५९ मिनिटे चाललेल्या सामन्यात सेरेनाने शारापोव्हाला ६-१, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. शारापोव्हा विरुद्ध सेरेनाचा हा सलग १९ वा विजय आहे. या दोघींमध्ये आतापर्यंत झालेल्या २२ सामन्यात शारोपोव्हाला केवळ २ सामन्यात सेरेनाला थोपवण्यात यश आले आहे. सामन्यानंतर सेरेना म्हणाली, जेव्हा जेव्हा मी शारापोव्हाच्या विरोधात कोर्टवर उतरते तेव्हा तेव्हा मी माझा सर्वश्रेष्ठ खेळ करण्यावर विशेष भर देते. शारापोव्हा विरुद्ध खेळताना एकाग्रतेने खेळावे लागते.

पहिला सेट जिंकून सुमितचा फेडररला धक्का, पण सामना 

दुसरीकडे पुरुष गटात स्विसच्या रॉजर फेडररने भारताच्या सुमीत नागलला पराभूत केले. जवळपास अडीच तास चाललेल्या सामन्यात सुमीतने लक्षवेधी खेळ दाखवला. पहिला सेट जिंकून त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोव्हिचनेही पुढच्या फेरीत प्रवेश केला. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Serena Williams Crushes Maria Sharapova at the US Open 2919 novak Djokovic and roger Federer also in next round