पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI: विडींज विरुद्धच्या टी-२० साठी टीम इंडियाची घोषणा

भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

बांगलादेशचा दौरा संपताच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ६ डिसेंबरपासून विंडीज आणि भारत यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होईल. भारत आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी-२० साठी गुरुवारी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. 

भारतीय महिलांनी कॅरेबियन महिलांना केलं क्लीन स्विप

विश्रांतीनंतर विराट कोहीलचे संघात कमबॅक झाले असून गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची अखेरची बैठक होती. एमएसके प्रसाद यांच्यासह निवड समितीचे अध्यक्ष गगन खोडा यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. 

ऐतिहासिक सामन्याची उत्सुकता भारत-पाक सामन्यासारखी: कोहली

भारतीय टी-२० संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार. 

टी-२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना : ६ डिसेंबर २०१९ मुंबई
दुसरा टी-२० सामना : ८ डिसेंबर  २०१९ तिरुवनंतपुरम 
तिसरा टी-२० सामना : ११ डिसेंबर २०१९ हैदराबात

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना : १५ डिसेंबर २०१९ चेन्नई  
दुसरा एकदिवसीय सामना : १८ डिसेंबर २०१९  विशाखापट्टणम
तिसरा एकदिवसीय सामना : २२ डिसेंबर २०१९  कटक
मायदेशातील या स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:senior selection committee announced india squad for west indies t20 and odi series virat kohli mohammed shami bhuvneshwar kumar come back in team