पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वर्ल्डकपमध्ये सिलेक्टर्सनां अनुष्काला चहा देताना पाहिलंय'

फारूख इंजिनीअर यांची निवड समितीवर टीका

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनीअर यांनी सध्याच्या संघ निवड समितीवर कडाडून टिका केली आहे. 'भारतीय संघाची सध्याची निवड समिती 'मिकी माउस' निवड समिती आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जाणारे फारुख  इतक्यावरच थांबले नाही, निवड समितीच्या काही लोकांना मी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी चहा आणतानाही पाहिलंय, असा गौप्यस्फोटही त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

IND vs BAN : हवेचा दर्जा खालावला, तरीही पहिला सामना दिल्लीतच होणार !

 'निवड समितीमधील लोकांची निवड कशी होते? त्यातले अनेकजण तर १० ते १२ टेस्टमॅचच खेळले असतील. त्यातल्या एका सिलेक्टरला मी ओळखतही नाही, त्यानं भारतीय संघाचं ब्लेझर घातलं होतं त्यामुळे तो सिलेक्टर असल्याचं एकानं मला सांगितलं. वर्ल्ड कप सामन्यादरम्यान त्यातले सगळेच विराटच्या पत्नीसाठी चहा घेऊन येत होते', अशी बोचरी टीकाही फारूख इंजिनीअर यांनी केली आहे.

मानसिक आरोग्याच्या कारणावरून मॅक्सवेलची क्रिकेटमधून विश्रांती

दिलीप वेंगसरकर यांसारखे अनुभवी व्यक्ती निवड समितीवर असायला  हवे मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.