पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या क्रिकेटरला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी

स्कॉटलंडचा क्रिकेटर माजिद हक

सध्याच्या घडीला जगभरात कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. क्रीडा क्षेत्रातील काही खेळाडू देखील कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. खेळ जगतात फुटबॉलच्या मैदानातील अनेक खेळाडू कोरोनाशी लढा देत असताना यात आता एक क्रिकेटरची भर पडली आहे. क्रिकेट खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची पहिली केस समोर आली आहे. स्कॉटलंडकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी वंशाचा फिरकीपटू माजिद हकला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भा माहिती दिली आहे.

जनता कर्फ्यू : .... रविवारी या सेवा राहणार बंद

माजिदवर ग्लास्गोच्या रॉयल अलेक्सांद्रा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून लवकरच डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त करत त्याने आपल्या चाहत्यांना कोरोनाशी संघर्ष करत असल्याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही त्याने आभार मानले आहेत. माजिदने 2006 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर 2015 च्या विश्वचषकात त्याने बांगलादेशविरुद्धच अखेरचा सामना खेळला होता. माजिदपूर्वी न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्यूसन आणि केन रिचर्डसन हे दोन क्रिकेटर्समध्ये कोरोनाची लक्षणं असल्याची चर्चा रंगली होती. मात्र तपासणीनंतर दोघांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. माजिद हा कोरोनाची लागण झालेला पहिला क्रिकेटर आहे. 

'कोरोना विषाणूसंदर्भात आमच्या माहितीकडे WHO ने दुर्लक्ष केले'

कोरोनाच्या थैमानामुळे क्रीडा क्षेत्रातील वेळापत्रक कोलमडले आहे. क्रिकेट, फुटबॉलच नव्हे तर टोकियो येथे नियोजित आगामी ऑलिंम्पिक स्पर्धेवरही संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडली आहे. जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये कोरोनाची खबरदारी म्हणून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातून परतल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील 16 सदस्यीय संघाला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. न्यूझीलंड संघालाही अशाच प्रकारच्या सूचना त्यांच्या क्रिकेट बोर्डाने दिल्या आहेत.