पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरच्या वादात सरफराजही उतरला मैदानात

सरफराज अहमद

केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानमधून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवा झाली आहे. पाकचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानी संघाचा कर्णधार सरफराज अहमदनं काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या जनतेसोबत असल्याचे विधान त्याने केले आहे.  

J&K: ईदचा उत्सव आनंदात साजरा, मुख्य सचिवांनी गोळीबाराचे वृत्त फेटाळलं

पाकिस्तान प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ईद दिवशी नमाज अदा केल्यानंतर पाकिस्तानमधील एका पत्रकार परिषदेत सरफराज अहमदने काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या भारताने घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले.  तो म्हणाल की, अल्लाह चरणी प्रार्थना करतो की सद्य परिस्थितीतून काश्मीरी बांधवाना लवकरात लवकर बाहेर काढ. आम्ही काश्मीरी बांधवासोबत आहोत, असेही तो म्हणाला. 

'कोहली वनडे क्रिकेटमध्ये ७५ ते ८० शतकांचा पल्ला गाठेल'

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतामध्ये पुलवामा सारखा हल्ला होऊ शकतो, असे धक्कादायक वक्तव्य केले होते.