पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

याचा जन्मच मीम्ससाठी! पाकचा माजी कर्णधार पुन्हा ट्रोल

सरफराज पुन्हा ट्रोल

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सरफराज  'हम गोरा, को खोज रहे हैं ब्रो...' असे शब्द उच्चारताना ऐकायला मिळत आहे. या वर्णभेदी टिपण्णीवरुन सरफराजला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. माजी कर्णधार सरफराज सध्या कठीण परिस्थितीतून जोतोय. मैदानात आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी त्याची फजित होताना पाहायला मिळत असताना त्यात आणखी एक भर पडली आहे. राष्ट्रीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर वर्णभेदी वक्तव्यावरुन तो अडचणीत सापडलाय.  

फिंच म्हणाला, विराटच्या वाघांना रोखणं 'मुश्किल', पण

सरफराज अहमदच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा भडिमार होताना पाहायला मिळत आहे. याचा जन्मत मीम्ससाठी झालाय, अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्याला फैलावर घेतले आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेपासून सरफराज अहमदचे दिवस फिरले आहेत. यापूर्वी त्याला फिटनेसवरुन ट्रोल करण्यात आले होते. शिवाय मैदानात क्षेत्ररक्षणावेळी आळस देतानाचा त्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.  

IND vs SL: मालिका व सामनाही टीम इंडियाच्या खिशात

विश्वचषकानंतर त्याच्यावर नेतृत्व गमावण्याची नामुष्की ओढावली. एवढेच नाही तर कसोटी आणि टी-२० संघातून त्याला डच्चू देण्यात आला. पाकिस्तानी संघाने अझर अलीला कसोटी तर बाबर आजमकडे टी-२० संघाचे नेतृत्व दिले आहे. टी-२० मध्ये अव्वलस्थानी असताना देखील सरफराजच्या नेतृत्वाखाली मागील वर्षात संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच त्याला कर्णधारपद गमवावे लागले, अशी चर्चा आहे. बांगलादेश विरुद्धच्या आगामी मालिकासाठी त्याची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. या दौऱ्याला अद्याप बांगलादेश बोर्डाने पुष्टी दिलेली नाही. या आगामी दौऱ्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका तसेच दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसंदर्भातील अंतिम निर्णय हा बांगलादेश क्रिकेट बोर्डावर अवलंबून आहे.