पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरफराजला दणका, कर्णधारपदासह संघातील स्थानही गमावले

पाक बोर्डाने सरफराज अहमदचे नेतृत्वाला लावला सुरुंग

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने यष्टिरक्षक आणि फलंदाज सरफराज अहमदला चांगलाच दणका दिला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात त्याच्याकडे असणारी नेतृत्वाची धूरा काढून घेण्यात आली आहे. संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पाक क्रिकेट मंडळाने हा निर्णय घेतला असून कसोटी आणि टी-२० क्रिकेट संघासाठी पाकने दोन नव्या संघ नायकांची नियुक्ती केली आहे.

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन टी-२० सामन्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात करणार आहे. टी-२० सामन्यासाठी धडाकेबाज फलंदाज बाबर आझमकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकापर्यंत बाबर आझमकडे टी-२० संघाची धूरा सोपवण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अझर अली पाक संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. सरफराजने फक्त कर्णधारपद गमावलेले नाही तर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातूनही डच्चू देण्यात आला आहे.  

INDvsSA : आफ्रिकेसह भारतासमोरही प्लेइंग इलेव्हनची 'कसोटी'

पाक दौऱ्यावर आलेल्या नवख्या श्रीलंकन संघाने सरफराज अमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला टी-२० मालिकेत ३-० असे पराभूत केले होते. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तानने निराशजनक कामगिरी केली होती. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकने २०१७ मध्ये चम्पियनशीप चषक उंचावला होता. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय संघाला पराभूत केले होते. पण त्यानंतर पाकिस्तानी संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे सरफराजच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झालेल्या मिसबाह उलहक देखील सरफराजच्या नेतृत्वावर नाखुश होता. अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलत सरफराजला कर्णधारपदावरुन पायउतार केले.  

INDvsSA : फाटक्या नशीबाच्या कर्णधाराला टॉसची चिंता

 पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मनी म्हणाले की, सरफराजला कर्णधारपदावर हटवण्याच निर्णय घेणे कठिण होते. पण सध्याच्या घडीला त्याची कामगिरी खूपच ढासळली आहे. संघाचा विचार करुन मंडळाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Sarfaraz Ahmed stripped off captaincy from Tests and T20Is azhar ali will be test captain and babar azam will be t20i captain