पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज

सकलेन मुश्ताकने भारत-पाक यांच्यादरम्यान सचिनसोबत घडलेला किस्सा शेअर केला आहे.

भारत-पाक यांच्यातील सहारा चषक मालिकेदरम्यानचा किस्सा शेअर करताना शकलेनने म्हटले आहे की, मी त्यावेळी संघात नवीन होतो. माझ्या कर्णधाराने जेव्हा माझ्या हातात चेंडू दिला तेव्हा सचिनविरोधात गोलंदाजी करताना स्लेजिंगचा वापर करायचे ठरवले. या रणनितीने सचिनला सहज रोखता येईल, असे मला वाटले. पण सचिनने प्रेमळ भाषेत माझी कृती चुकीची असल्याचे सांगितले.

'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'

स्लेजिंगनंतर सचिन माझ्या जवळ येऊन म्हणाला की, मी तुझ्यासोबत कधीच वाईट वर्तन केले नाही. मग तू माझ्याशी अशा पद्धतीने का वागत आहेस.खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून मी तुला नेहमीच उच्च दर्जा देतो. हे शब्द सकलेनच्या मनाला चांगलेच लागले. त्याला स्वत:चीच लाज वाटली, असे खुद्द सकलेनने सांगितले. सचिनसोबत मैदानावर केलेल्या कृत्याची मी याचवेळी माफी मागितली. एवढेच नाही तर पुन्हा कधीच मी सचिनविरोधात स्लेजिंग केले नाही, असेही सकलेन म्हणाला. सचिनची नजर ही अफलातून होती. दूसरा, ऑफ स्पिन तसेच गोलंदाज टाकणारा वेगळ्या पद्धतीचा चेंडू सचिन सहज ओळखायचा. तो एका विशिष्ट फ्लोमध्ये फलंदाजी करण्यावर भर द्यायचा, असे वर्णन करत सचिनची शैली भारी होती, असे सकलेनने म्हटले आहे. सचिनसोबतच त्याने राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या फलंदाजीचेही कौतुक केले.

शुक्रिया! पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा

सध्याच्या घडीला जगभरासह देशात कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता क्रिकेट स्पर्धेला ब्रेक लागला आहे. देशातील संकटामुळे मास्टर ब्लास्टर सचिनने आपला वाढदिवसही साजरा केला नाही. कोरोनाचा लढा देताना मास्टर ब्लास्टर आपल्या परिने योगदान देताना दिसत आहे. सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय घरात बसून कोरोनाविरोधातील लढ्यात सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना करताना पाहायला मिळत आहे.