पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात प्रत्यार्पण

संजीव चावला

दक्षिण आफ्रिकेच्या सन २००० मधील भारत दौऱ्यावेळी सामना निश्चितीचा (मॅच फिक्सिंग) आरोप असलेल्या संजीव चावला याला गुरुवारी इंग्लंडहून प्रत्यार्पणाच्या आधारे नवी दिल्लीत आणण्यात आले. संजीव चावला यांचा सामना निश्चितीमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे. त्याची आता चौकशी करण्यात येईल.

राज्यसभा निवडणूक : सातव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच?

१९९२ मध्ये इंग्लंडशी प्रत्यार्पण करार करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच या पद्धतीने एका आरोपीला भारतात आणण्यात आले आहे. या आधी समीरभाई विणूभाई पटेल यांना २०१६ मध्ये भारतात आणण्यात आले होते. पण त्यावेळी पटेल यांनी स्वतःहून २००२ च्या गुजरात दंगल प्रकरणात चौकशीसाठी भारतात येण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांना इंग्लंडने भारतात पाठविले होते.

२३ जानेवारी रोजी इंग्लंडमधील न्यायालयाने संजीव चावला यांना भारतीय तपास पथकांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले होते. नवी दिल्लीत आल्यावर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येईल.

राम शिंदेच्या याचिकेवरून हायकोर्टाची रोहित पवार यांना नोटीस

भारतीय तपास पथकांना एका प्रकरणाचा तपास करताना केलेल्या फोन टॅपिंगमधून संजीव चावला यांचा सामना निश्चितीत हात असल्याचे दिसून आले होते. जानेवारी ते मार्च २००० या काळात त्यांनी सामना निश्चितीसाठी प्रयत्न केल्याचे तपासात दिसून आले. फेब्रुवारी ते मार्च २००० या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा तत्कालिन कर्णधार हन्सी क्रोनिए याच्याशी कट करून सामना निश्चित केल्याचा संजीव चावला यांच्यावर आरोप आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sanjeev Chawla accused in the 2000 cricket match fixing racket extradited from UK to India