पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गावसकरांचे विराटसंदर्भातील वक्तव्य माजरेकरांना खटकलं

सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर

लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी विराटच्या नेतृत्वाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नावर माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी असमहती दर्शवली आहे. कोहलीकडे विंडीज दौऱ्यावसाठी दिलेले नेतृत्व नियमबाह्य असल्याचे गावसकर यांनी म्हटले होते. विश्वचषकापर्यंत कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. पुन्हा त्याच्याकडे कर्णधारपद देण्यापूर्वी किमान पाच मिनिटांची का होईना पण अधिकृत बैठक बोलावून चर्चा करणे अपेक्षित होते, असा उल्लेख त्यांनी केला होता. 

संजय मांजरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून गावसकरांच्या मताशी असमहती दर्शवत कोहलीचे समर्थन केले आहे. माजरेकारांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, निवड समितीने विराट कोहलीकडे नियमबाह्य नेतृत्व दिल्याच्या गावसकर सरांच्या मताशी सहमत नाही. भारतीय संघाने विश्वचषकात खराब कामगिरी केलेली नाही. संघाने ७ सामने जिंकले तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवड समितीच्या सदस्यांमध्ये पदापेक्षा प्रामाणिकपणा गरजेचा असतो, असा उल्लेखही माजरेकरांनी केला आहे.  

BCCI निवड समिती कुचकामी, विराटकडे नियमबाह्य दिले नेतृत्व : गावसकर

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विंडीज दौऱ्यासाठी तिन्ही प्रकारातील नेतृत्व हे विराट कोहलीकडे दिले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या मैदानातून भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विंडीज दौऱ्यात भारतीय संघ कसा कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.