पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फलंदाजी प्रशिक्षक बांगर यांना मुदतवाढ मिळणे 'मुश्किल'

विराट कोहली आणि संजय बांगर

इंग्लंड आणि वेल्समधील विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर अडचणीत येवू शकतात. आयएएनएसच्या वृत्तानुसार, विश्वचषक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि अन्य कोचिंग स्टाफचा करार ४५ दिवसांनी वाढवला जाणार आहे. मात्र, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना अधिक अवधी मिळणार नसल्याचे संकेत आहेत. त्यांनी आपली भूमिका आणखी चोख पार पाडायला हवी होती, असा मतप्रवाह बीसीसीआयच्या एका गोटात निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना वाढीव मुदत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. 

साहाय्यक प्रशिक्षक बांगर यांच्याकडे फलंदाजीचीही जबाबदारी आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या तुलनेत बांगर यांची कामगिरी फिकी वाटते. अनेकदा भारतीय संघ फलंदाजीमध्ये कोलमडला आहे. चौथ्या क्रमाकांला योग्य फलंदाजाची निवड करणेही भारतीय संघाला जमले नाही.  

ICC WC 2019: विराट-शास्त्रींना करावा लागेल CoA च्या बाउन्सरचा सामना 
 
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारी आयएएनएसशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही खेळाडूंच्या पाठिशी आहोत. कारण त्यांनी केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यात खराब कामगिरी केली आहे. पण स्टाफच्या प्रक्रिया आणि निर्णयासंदर्भात चौकशी करणे गरजेचे असते. त्यावरुन भविष्यातील निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले. 
अधिकारी पुढे म्हणाले की,  ' दुखापतीमुळे विजय शंकरने स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी संजय बांगर यांनी अष्टपैलू फिट असल्याचे सांगितले होते. वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह  संघ व्यवस्थापनामध्ये गोंधळ जाणवत होता. सल्लागार समितीकडेही दुर्लक्ष केले गेले, असेही त्यांनी म्हटले आहे.  

पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया