भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडलेल्या रोजंदारीवर काम काम करणाऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे देशातील विविध राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांची चांगलीच अबदा झाल्याचे पाहायला मिळते. अशा लोकांसाठी भोजन आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी सानिया मिर्झाने पुढाकार घेतलाय.
घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल: मुख्यमंत्री
मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांवर देशातील सद्यपरिस्थितीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. जीवघेण्या आजाराने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. सानियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'सफा' या संस्थेच्या कार्याचा दाखला देत एक फोटो शेअर केलाय. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना आपण मदतीचा हात द्यायला हवा, असे आवाहनही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
काबूलममध्ये गुरुद्वारात आत्मघातकी हल्ला, ११ जण ठार
सानियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, सफा आणि अन्य काही लोक सोबत असल्यामुळे अडचणीतील असलेल्या लोकांना मदत करत असून आपल्याला शक्य असेल तेवढ्या कुटुंबियांना मदतीचा हात द्या, असे तिने म्हटले आहे. संपूर्ण जग या संकटातून जात आहे. सर्वकाही ठिक होईल या आशेने आपण काहीजण घरामध्ये बसलो आहे. काहींचे नशीब आपल्यासारखे नाही. त्यांना साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. आपण त्यांची काळजी घ्यायला हवी, असा संदेश देत तिने हातावर पोट असलेल्यांची मदत करा, असे म्हटले आहे.