पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Fed Cup : सानिया मिर्झाची भारतीय संघात निवड

सानिया मिर्झा

फेड चषकाच्या आशिया झोन ग्रुप ए च्या सामन्यांसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा या स्पर्धेतून पुन्हा एकदा कोर्टवर उतरणार आहे. भारतीय टेनिस महासंघाच्या निवड समितीने सहा सदस्यीय संघात सानियाचा समावेश केला आहे.  

नेटकऱ्यांच्या नजरेत या दशकातील बादशहा ओन्ली MSD!

सानियाशिवाय संघात  अंकिता रैना, रिया भाटिया, रूतुजा भोसले, करमन कौर थांडी यांचा समावेश आहे. सौजन्या बावीशेट्टी हिची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. पुरुष गटातील विशाल उप्पलकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून अंकिता भांबरी यांची प्रशिक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

बुमराहसाठी दादानं प्रोटोकॉल ठेवला बाजूला

यापूर्वी सानिया मिर्झा २०१७ मध्ये चीन ओपनमध्ये कोर्टवर उतरली होती. त्यानंतर मातृत्वामुळे तिला खेळाच्या मैदानापासून दूर रहावे लागले. ३३ वर्षीय वर्षीय सानिया यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर आगामी वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमध्ये अर्थात ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही खेळणार असल्याचे  सानिया जाहीर केला होते. जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या यूक्रेनच्या नादिया किचेनोकच्या साथीने ती आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन करणार आहे.  

मातृत्वानंतर सानिया मिर्झा नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज

पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाहबद्ध झालेल्या सानियाने ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म दिला होता. इझाज असे तिच्या मुलाचे नाव आहे. मातृत्वानंतर सहावेळा ग्रँडस्लॅम विजेता ठरलेली सानिया पुन्हा जोमाने दुसरी इनिंग खेळण्यासाठी उत्सुक आहे. मातृत्वानंतर मैदानात उतरणे हे एखाद्या दुखापतीतून सावरुन कमबॅक करण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आव्हानात्मक असते. सानिया मिर्झा हे आव्हान पेलण्यासाठी मेहनतही घेत आहे. तिचा हा प्रवास कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.