पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सानियाची बहिण अनाम आणि असद अझरुद्दीन लवकरच विवाहबंधनात

अनाम आणि असद हे दोघेही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतात

सानिया मिर्झा हिची बहिण अनाम आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असद हे दोघेही लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. खुद्द सानिया मिर्झा हिने याबद्दल माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून अनाम आणि असद हे दोघे एकमेकांना ओखळतात. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू होती. ती खरीच असल्याचे सानिया मिर्झा हिने स्पष्ट केले.

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच जागावाटपात भाजपशी तडजोड - उद्धव ठाकरे

सानिया मिर्झा हिने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीनुसार, डिसेंबरमध्ये अनामचे लग्न होणार आहे. आम्ही सगळे नुकतेच तिच्या बॅचलर ट्रिपसाठी पॅरिसला गेलो होते. नुकतेच तेथून परतलो आहोत. एका चांगल्या मुलाशी तिचे लग्न होते आहे. याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्याचे नाव अर्थात असद असे आहे आणि तो अझरुद्दीन यांचा मुलगा आहे.

 

राष्ट्रवादीला धक्का, अवघ्या ३ दिवसांत आमदार घोडा पुन्हा शिवसेनेत

ऑगस्टमध्ये तिने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ऑगस्टमध्ये मी पुन्हा एकदा टेनिस खेळण्यास सुरुवात करेन, असे मला वाटले होते. पण ते शक्य होणार नाही. त्यामुळे मी जानेवारीमध्ये परत एकदा टेनिस कोर्टवर उतरणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sania Mirza confirms her sister Anam is marrying Mohammad Azharuddins son Asad Azharuddin