टेनिस स्टार सानिया मिर्झाने क्रिकेट दौऱ्यावर क्रिकेटर्सच्या पत्नी किंवा मैत्रीणींना परवानगी न देण्याबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही मानसिकता महिलांना ताकदीचे प्रतिक न मानता लक्ष विचलित करणारी असल्याचे तिने म्हटले आहे. सानियाने एका कार्यक्रमामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.
PKL : पुणेरी पलटन अन् तेलुगू टायटन्स सामन्यादरम्यान अनोखा विक्रम
ती म्हणाली की, बऱ्याचदा भारतीय क्रिकेट संघ किंवा अन्य देशातील क्रिकेट संघाना पत्नी किंवा मैत्रीणीला दौऱ्यावर नेण्याची परवानगी नाकारली जाते. खेळाडूंचे लक्ष विचलित होते, असा यामागचा तर्क असतो. याचा अर्थ काय? महिला असे कोणते कृत्य करतात ज्यामुळे पुरुषांचे लक्षविचलित होते? ही मानसिकता चुकीची आहे, असा टोलाही तिने लगावला.
फेडररला लागलंय बॉलिवूडचं याड, नेटकऱ्याने सुचवले हे चित्रपट
दौऱ्यावर खेळाडूंसोबत पत्नी किंवा मैत्रीण असल्यामुळे पुरुष खेळाडूंनी अधिक चांगले यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत. खेळाडूंना याचा फायदाच होतो, असे ठाम मतही तिने मांडले. यावेळी तिला विश्वचषकातील पाकिस्तानच्या पराभवाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने विराट कोहली अनष्काचा दाखला दिला. विराट शून्यावर बाद होतो तेव्हा लोक अनुष्काला दोषी ठरवून मोकळे होतात. पण हा तर्कच चुकीचा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवाची जबाबदारी देखील माझी नाही, असे तिने सांगितले.