पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICCच्या पेटाऱ्यातून: पुन्हा एकदा पहा धोनी-कोहलीची झलक!

आयसीसीने ट्विटरवरुन शेअर केलेले छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाच्या मैदानावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू मग तो भारतीय असो किंवा आयपीएलमध्ये आपल्या भात्यातून धावांची बरसात करुन भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला परदेशी खेळाडू असोत सर्व मंडळी सध्या सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या घरात थांबा या नाऱ्याला प्रतिसाद देत ही मंडळी चाहत्यांनाही सकारात्मक संदेश देत आहेत.  

भारतीय चाहत्यांनी वॉर्नरला दिला 'रामायण-महाभारत' पाहण्याचा सल्ला

बिकट परिस्थितीतील सामना जिंकण्यासाठी सोशल डिस्टंगचा प्रयोग सुरु असताना क्रिकेट चाहता आपल्यापासून दूर जाऊ  नये, याची खबरदारी म्हणून आयसीसीने जून्या सामन्यांचे पुन:प्रेक्षपण करुन घरात बसलेल्या क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजनाचा वसा जपण्याचे ठरवले आहे. आयसीसीकडून ट्विटरच्या माध्यमातून कोणत्या सामन्याचे कधी आणि किती वाजता पुन:प्रेक्षपण करण्यात येणार आहे याची माहिती देण्यात येत आहे. रोमहर्षक सामन्याची झलक कुठे पाहता येईल, याची माहितीही आयसीसी ट्विटरच्या माध्यमातून देत आहे.  

BCCI ने या फ्रेममधून दिले धोनीवरील प्रेम कमी झाल्याचे संकेत

आयसीसीने ट्विटरच्या माध्यमातून जारी केलेल्या आजच्या वेळापत्रकानुसार, २०१४ च्या टी-२० विश्वचषकातील थरारक सामन्यांचे पुन:प्रेक्षपण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील भारत श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना सायंकाळी साडेपाचवाजता पाहता येईल. महेंद्रसिंह धोनी विरुद्ध कुमारा संगकारा आणि विराट कोहली विरुद्ध महिला जयवर्धने यांच्यातील सामन्याचा फ्लॅशबॅक चाहत्यांना आयसीसीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन घेता येणार आहे. 
भारत-श्रीलंका यांच्याशिवाय आजच्या वेळापत्रकात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट, युनायटेड किंगडम या संघाच्य सामन्याचाही आनंद लुटता येईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sangakkara vs Dhoni and Jayawardene vs Kohli are some of the superstars who will be in action as we revisit the T20WorldCup 2014 final in full on Facebook