पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचा ठपका!

सनथ जयसूर्या

श्रीलंकेचा माजी सलामीवीर आणि कर्णधार सनथ जयसूर्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच्यावर भ्रष्टाचार नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. याप्रकणी १४ दिवसांत स्पष्टिकरण द्यावे असे आयसीसीने त्याला बजावले आहे.  

जयासूर्याने दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आयसीसीने केला आहे. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट मंडळासोबतच्या त्याच्या कार्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. जयसूर्यावर आयसीसी नियमावलीतील परिशिष्ट २.२.३ आणि २.१.१, २.४.७ नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यात श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांना लाच देणे, आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या निकालासंदर्भातील आरोपासह भ्रष्टाराविरोधी समितीला सहकार्य न केल्याचा आरोपांचा समावेश आहे. यासंदर्भातील स्पष्टिकरणासाठी आयसीसीने १४ दिवसांची मुदत दिली आहे.

सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचा ठपका!

जयसूर्याने ४४५ एकदिवसीय, ११० कसोटी आणि ३१ टी-२० सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात एकदिवसीयमध्ये १३ हजार ४३० धावा, कसोटीत ६ हजार ९७३ आणि टी-२० सामन्यात ६२९ धावा त्याच्या नावे आहेत. २६ डिसेंबर १९८९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २८ जून २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sanath jayasuriya is charged by icc for violation of anti corruption code give 14 days to reply