पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

समलैंगिक संबंधावरुन बहिणीच मला ब्लॅकमेल करत होती: दुती चंद

भारताची धावपटू दुती चंद

भारताची धावपटू दुती चंद हिने आपले समलैंगिक संबंध असल्याचे जाहिररित्या सांगितले होते. आता तिने सर्वांसमोर येऊन आपले नाते उघड करण्याची गरज का वाटली यावरही स्पष्टिकरण दिले आहे. माझी सख्खी बहिण मला ब्लॅकमेल करत होती. तिने माझ्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. एवढेच नाही तर तिने मारहाण देखील केली, अशी माहिती दुती चंदने एएनआयला दिली. तिच्या या प्रकारामुळेच मला सर्वांसमोर समलैंगिक संबंधाबद्दल उघडपणे बोलावे लागले, असे ती म्हणाली.

दुतीने आपले समलैंगिक संबंध जाहीर केल्यानंतर बहिणीने तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली होती. त्यावर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दुती चंद म्हणाली होती. माझ्या नात्याबद्दल मी सर्वांना सांगितले आहे. मला यात काहीही चुकीच वाटत नाही. मी कोणाच्याही दबावामुळे नाते संपवणार नाही, अशी ठाम भूमिका तिने घेतली आहे.  

होय, मी समलैंगिक; भारतीय धावपटू दुती चंदचा खुलासा

२३ वर्षीय धावपटू दुतीने समलैंगिक संबंधाचा खुलासा केला असला तरी अद्याप तिने आपल्या जोडीदाराचे नाव गुपितच ठेवले आहे. ही प्रत्येकाची व्यक्तिगत आवड आहे. सध्या मी आगामी विश्वचषक आणि ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करत असून मी जोडीदारासोबत स्थिरस्थावर होणार असल्याचे तिने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:same sex relationship My own sister is black mailing me she asked me for Rs 25 lakh says dutee chand