पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साक्षी म्हणते, लेकीमुळे आम्हा दोघांना मिळाली नवी ओळख

महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलच्या मैदानात तो धमाकेदार पुनरागमन करेल, अशी आशा होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे धोनी खेळी पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

धोनी क्रिकेटच्या मैदानातून दूर असला तरी त्याची पत्नी साक्षीच्या सोशल सक्रीयतेमुळे त्याचे दर्शन घडतच असते. साक्षीने पुन्हा एकदा धोनीसोबतचा एक खास फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केला आहे. या फोटोला तिने खास असे कॅप्शन दिले आहे. लोक आम्हाला आता आमच्या लेकीच्या नावाने ओळखतात, असे तिने म्हटले आहे. 

कोरोना : श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून सरकारला कोट्यवधीची मदत

साक्षीने  फोटाला फोटो कॅप्शनमध्ये लिहलंय की, आता लोक आम्हाला झिवाचे मम्मी-पप्पा म्हणून ओळखतात. ज्याप्रमाणे क्रिकट चाहत्यांमध्ये धोनीची क्रेझ आहे अगदी तशीच लोकप्रियता सोशल मीडियावर झिवालाही मिळताना दिसते. धोनीची पत्नी साक्षीचा चाहता वर्गही लाखोच्या घरात आहे. धोनी अन् झिवा यांचे फोटो आणि व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पंसती मिळताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. 

इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये धोनी अखेरचा सामना खेळला आहे. या सामन्यापासून क्रिकेटच्या मैदानातून दूर असल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. आयपीएलमध्ये चेन्नईकडून मैदानात उतरण्यासाठी त्याने जबऱ्या सराव केल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेतील कामगिरीतून तो ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवू शकतो, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी दिले आहेत. मात्र कोरोनामुळे आयपीएल स्पर्धेवरील संकट धोनीच्या मार्गातील अडथळा ठरणार असल्याचे चित्र सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे.

कोरोनाशी लढताना धर्मापलिकडे जाऊन विचार करा : अख्तर