पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'परमेश्वराच्या मनात असेल तर सायना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल'

सायना नेहवालने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय

सायनाचे वडील हरवीर सिंह यांनी पीटीआयला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,  सायनाने ऑलिम्पिकची तयारी कायम ठेवायला हवी. जर परमेश्वराच्या मनता असेल तर सायना पात्र ठरेल. पक्षामध्ये तिच्यासाठी कोणताही कठोर नियम नाहीत. आपले सर्वश्रेष्ठ योगदान द्यावे, या अटीवर तिला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. परंतु पक्षाला प्रचार किंवा अन्य कामासाठी जेव्हा तिची आवश्यकता वाटेल तेव्हा ती पक्षासाठी उपलब्ध राहिल, असेही ते यावेळी म्हणाले.  

तिची अन् कोहलीची सोशल मीडियावर 'विराट' चर्चा!

चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी सायनाकडे फारच कमी कालावधी आहे. बीडब्ल्यूएएफच्या ऑलिम्पिक पात्रता नियमानुसार, प्रत्येक खेळ प्रकारात देशातील दोन खेळाडू पात्र ठरतात. यासाठी सायनाला एप्रिलच्या अखेरपर्यंत जारी करण्यात येणाऱ्या रँकिंगमध्ये पहिल्या १६ मध्ये स्थान मिळवावे लागेल.  सायनाने जानेवारी २०१९ मध्ये इंडोनेशिया मास्टर्स  स्पर्धेनंतर एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मागील १४ स्पर्धेत सायनाला आठ स्पर्धेत पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. बीडब्ल्यूएफ रँकिंगमध्ये ती १८ व्या स्थानावर असून ऑलिम्पिक पात्रता रँकिंगमध्ये ती २२ व्या स्थानावर आहे. 

Australian Open : फेडररला शह देत जोकोविचनं गाठली फायनल

सायना नेहवालच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर माजी बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिने नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. ट्विटच्या माध्यमातून नाव न घेता ज्वालाने सायनावर टीका केली होती. विना कारण खेळायला सुरुवात केले आणि विनाकारण पार्टीमध्ये प्रवेश केला, अशा आशयाचे ट्विट ज्वालाने केले होते.