पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाबो! ८ धावांत ऑल आऊट, १० खेळाडू शून्यावर बाद

क्रिकेटच्या मैदानातील अनोखा विक्रम

नेपाळमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आशियाई क्रीड स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानात निच्चांक धावसंख्येची नोंद झाली. महिला क्रिकेट खेळ प्रकारात यजमान नेपाळच्या महिलांनी प्रतिस्पर्धी मालदीव महिलांना अवघ्या ८ धावांत ऑल आऊट करत क्रिकेटच्या मैदानात अनोखा विक्रम नोंदवला. ही त्यांची दुसरी निच्चांकी धावसंख्या आहे. 

South Asian Games: पदतालिकेत भारत टॉपला, आतापर्यंत मिळाली एवढी पदक

शनिवारी झालेल्या सामन्यात मालदीव महिला क्रिकेट संघ ११.३ षटकात अवघ्या ८ धावांत गारद झाला. यापूर्वी बांगलादेश महिलांनी त्यांना २४९ धावांनी पराभूत केले होते. बांगलादेश महिलांनी २ बाद २५५ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर मालदिवच्या महिला संघ ६ धावांत ऑल आऊट झाला होता.  

हा अति क्रिकेटचा परिणाम आहे का? ढिसाळ क्षेत्ररक्षणावर युवी संतापला

नेपाळकडून सहा महिला गोलंदाजांपैकी ५ जणींनी निर्धाव षटके टाकली. या सामन्यात मालदीवने पहिल्या षटकात सहा धावा केल्या. त्यातही एकाच फलंदाजाने धावा केल्या. बाकी एकाही फंलदाजाला खाते उघडता आले नाही. मालदीवने दिलेले हे लक्ष्य यजमान नेपाळने एकही विकेट न गमावता सातव्या चेंडूवर पार केले.