पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१० वर्षांच्या चिमुकल्या 'Little Master' ला सचिनकडून शुभेच्छा

 सचिनचा चिमुकला चाहता

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांची संख्या कमी  नाही. क्रिकेटप्रेमींसाठी तो नक्कीच देवाच्या स्थानी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात सचिनचे कोट्यवधी फॅन आहेत. या फॅनपैकी सर्वांत चिमुकल्या  चाहत्यास सचिननं त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

..म्हणून IPL प्रशासकीय समितीने या खेळाडूला ठरवले अपात्र

ट्विटरवर आनंद मेहता नावाच्या युजर्सनं त्याच्या चिमुकल्या भाच्याचा फोटो शेअर केला होता. क्रिकेटच्या मैदानात बसलेल्या या चिमुकल्यानं सचिनची १० नंबरची जर्सी परिधान केली होती. मागून हुबेहुबे बालपणीच्या सचिनसारख्या दिसणाऱ्या या चिमुकल्याच्या फोटोबरोबर आनंद मेहतानं सचिनसाठी संदेशही लिहिला होता. 'तुम्ही जरी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आमच्या हृदयात तुमचं स्थान कायम राहणार आहे. ' असं या ट्विटमध्ये लिहिलं होतं. 

हा संदेश सचिनपर्यंत पोहोचला. हा फोटो शेअर केल्याबद्दल  सचिननं  आनंदचे आभार मानले. तसेच दहा महिन्याच्या मुलाला त्याच्या भविष्य़ासाठी सचिननं शुभेच्छाही दिल्या. 

ICC WT20 WC: शेफालीचं पहिले अर्धशतक हुकलं; तरीही भारताचा विजयी चौकार