पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमधून आपला सचिन नवी इनिंग सुरु करतोय!

सचिन तेंडुलकर

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून आपली नवी इनिंग सुरु करत आहे. या स्पर्धेत सचिन पहिल्यांदाच समालोचन करताना दिसणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या सामन्याने ओव्हलच्या मैदानातून विश्वचषक स्पर्धेला आजपासून (गुरुवार) सुरुवात होत आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकर समालोचन  करताना दिसणार आहे. 

WC 2019: विराट वर्ल्डकप जिंकून देईल, कपिल पाजींना विश्वास

सचिन तेंडुलकर स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवरुन हिंदी आणि इंग्लिशमध्ये समालोचन करताना दिसणार आहे. क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानात सचिनच्या नावे अनेक विक्रमाची नोंद आहे. त्यामुळे त्याला क्रिकटचा देव आणि विक्रमादित्या असे संबोधले जाते.  विश्वचषक स्पर्धेतही त्याची कामगिरी ही अभूतपूर्व अशीच राहिली आहे.  सहा विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताकडून प्रतिनिधीत्व केले असून विश्वचषक स्पर्धेत खेळताना त्याने सर्वाधिक २ हजार २७८ धावा केल्या आहेत. 

दुहेरी हितसंबंध प्रकरणातील सचिनवरील आरोप BCCI लवादाने फेटाळला

सहा विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताकडून प्रतिनिधीत्व केले असून विश्वचषक स्पर्धेत खेळताना त्याने सर्वाधिक २ हजार २७८ धावा केल्या आहेत. याशिवाय एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्याच नावे आहे. त्याने २००३ मध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत ११ सामन्यात ६७३ धावा ठोकल्या होत्या. २०११ मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता. या संघाचा सचिनही सदस्य होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: sachin tendulkar will debut as commentator in icc cricket world cup 2019 first match between england vs south africa