पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना आग असेल तर आपण हवा आहोत, लक्षात घ्या! - सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात आपल्याला संयम दाखवावाच लागेल, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. जीवघेण्या विषाणूला रोखायचे असेल तर लॉकडाऊनच्या दरम्यान आपल्याला सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल, असेही सचिनने म्हटले आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतवासियांना त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला दिलाय.

कोरोना इफेक्ट : ... या मोबाईल हँडसेटचे लाँचिंगही गेले पुढे

या व्हिडिओत सचिनने म्हटलंय की, कोरोना ही जर आग असेल तर ती पसरवणारी हवा आपणच आहोत. सरकारने आपल्याला घरी बसण्याची विनंती केली आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. काही लोक अजूनही सरकारच्या सूचनेला गांभिर्याने घेतना दिसत नाहीत. मी काही व्हिडिओ पाहिले ज्यामध्ये लोक मला क्रिकेट खेळताना दिसले. आपल्यातील कोणालाच कोंडमारा नको आहे. पण सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या. हे दिवस सुट्टीचे नाहीत हे लक्षात ठेवा. नियमाच पालन करुन स्वत:ला आणि देशाला संकटापासून वाचवा, असे आवाहन सचिनने केले आहे. 

महाभारत १८ दिवसांत जिंकले होते, कोरोनाची लढाई २१ दिवसांत जिंकू : मोदी

मी स्वत: मागील दहा दिवसांपासून घरातून बाहेर पडलेलो नाही. लॉकडाऊनच्या काळात मी माझ्यातील हा संयम कायम ठेवणार आहे. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची तुम्हाला एक संधी मिळाली आहे असे समजून घरीच बसा. घरातून बाहेर न पडता आपण डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी यांचा ताण कमी करु शकतो, ही गोष्टही ध्यानात घ्या, असा संदेश सचिनने देशवासियांना दिलाय.