पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मास्टर ब्लास्टर सचिन दिल्ली मॅरेथॉनसाठी सज्ज

सचिन तेंडुलकर

देशातील प्रसिद्ध मॅरेथॉन स्पर्धेला विश्वविक्रमी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हिरवा झेंडा दाखवणार आहे. २३ फेब्रुवारीला 'आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स नवी दिल्ली मॅरेथॉन' स्पर्धेच्या पाचव्या हंगामाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत १३ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स कंपनीचा ब्रँड अँम्बेसिडर आहे. त्याच्या उपस्थितीतच या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. 

सामना गमावला पण भावनिक ट्विटनं श्रेयसनं मन जिंकली!

फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किमी आणि ५ किमी या चार प्रकारांत ही मॅरेथॉन स्पर्धा भरविण्यात आली आहे. आयकॉनिक जवाहरलाल स्टेडियममधून या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन आणि राजपथ या मार्गांचाही समावेश करण्यात आला आहे. एनईबी स्पोर्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या  मॅरेथॉन स्पर्धेला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन संघटनेची मान्यता असून ही देशातील प्रसिद्ध मॅरेथॉनपैकी एक आहे. अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून या स्पर्धेला राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा दर्जा प्राप्त असून मोठ्या मॅरेथॉन किंवा चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्रतेसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते.  

एमएसके प्रसाद यांनी रायडूबद्दल बाळगलेले मौन अखेर सोडले

दिल्लीमध्ये धावण्यासाठी सध्याचे वातावरण खूपच उत्तम आहे. थंडीमध्ये स्पर्धकांना आपली क्षमता वाढवण्याची एक चांगली संधी आहे. पात्रतेच्या गुणासह स्पर्धकांना व्यक्तिगत रेकॉर्ड सुधारण्याची उत्तम संधी या स्पर्धेतून मिळेल, असे एनईबी स्पोर्टचे संचालक नागराज अडीगा यांनी म्हटले आहे. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी या स्पर्धेला पूर्वीपेक्षाही उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती दिली आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी आणखी आठवड्याभरचा कालावधी असून स्पर्धकांची संख्या अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sachin tendulkar to flag off New Delhi Marathon program to be held on 23rd of february jawarhar lal nehru stadium