पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विझी ट्रॉफीसाठी अर्जुन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश

अर्जुन तेंडुलकर

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आंध्र प्रदेशमध्ये २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विझी ट्रॉफीसाठी मुंबईच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. ५० षटकांच्या मालिकेसाठी मंगळवारी संघाची घोषणा करण्यात आली. त्यात त्याला संधी देण्यात आली आहे. १९ वर्षीय अर्जुनने यापूर्वी टी-२० मुंबई लीगमध्येही प्रतिनिधीत्व केले आहे. तो भारतीय संघाच्या सराव सत्रात अनेकवेळा नेट गोलंदाजही राहिला आहे.

'मुला अजून POK बाकी आहे', गौतम गंभीरचे आफ्रिदीला 'परफेक्ट' उत्तर

मुंबई लीग टी-२० मध्येही अर्जुन तेंडुलकरने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. मुंबई लीगमध्ये पदार्पण करताना १ विकेट घेतली आणि २३ धावा केल्या होत्या. 

मुंबई टी-२० लीगमध्ये अर्जुन सर्वाधिक महागडा खेळाडू (५ लाख रुपये) ठरला होता. लिलावात अर्जुन तेंडुलकरला अष्टपैलू विभागात १ लाख रुपयांच्या आधार मुल्यात समावेश करण्यात आला होता. 

आफ्रिकेची 'स्टेनगन' आता कसोटीत धडाडणार नाही

असा आहे मुंबईचा संघः हार्दिक तामोर (कप्तान), सुरजन आठवले, रुद्र धांडे, चिन्मय सुतार, आशा सरदेसाई, साईराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन, मीनल मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरोन, अथर्व पुजारी, मॅक्सवेल स्वामिनाथन, प्रशांत सोलंकी आणि विग्नेश सोलंकी.