पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या 'या' व्हिडिओचे होतेय कौतुक

सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून अनेकांचे मन खुश होईल. सचिनचे शेअर केलेल्या या व्हिडिओचे खूप कौतुक केले जात आहे. सचिनने क्रीडा दिनानिमित्त सेंट अँथनी वृध्दाश्रमामध्ये काही वेळ घालवला. सचिनने या वृध्दाश्रमातील वयोवृध्द महिलांसोबत कॅरेम खेळण्याचा आनंद घेतला. त्याचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फिट इंडिया मुव्हमेंट' या अभियानाची सुरुवात केल्यानंतर सचिनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काश्मीर तुमचे कधी होते?, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला टोला

सचिन तेंडुलकरने हा व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की, या 'वंडर वूमन्स' सोबत सेंट अँथनी वृध्दाश्रमामध्ये थोडा वेळ घालवला. या सर्व महिलांनी ज्या पध्दतीने मला प्रेम दिले त्यामुळे मला खूप धन्य झाल्या सारखे वाटते. कॅरम खेळण्यासाठी त्यांच्या उत्साहाला मर्यादा नव्हती. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर सांगितले 'खेळ आणि फिटनेस सर्वांसाठी आहे'.'

कच्छमध्ये पाकिस्तानी कमांडोंची घुसखोरी; गुजरातमध्ये हाय अलर्ट

२९ ऑगस्ट 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे त्यांच्या आठवणीमध्ये हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून घोषित करण्यात आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फिट इंडिया मुव्हमेंट' या अभियानाची सुरुवात केली. फिट इंडिया अभियानामध्ये देशभरातील अनेक उद्योजक, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत.  

पुण्यातील 'त्या' चिमुकलीची पूर्ववैमनस्यातून हत्या