पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजिंक्य रहाणेनंतर सचिन तेंडुलकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आला धावून

सचिन तेंडुलकर

मुसळधार पावसानंतर आलेल्या महापूराचा फटका सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला. दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांना पूराच्या पाण्याने वेढा घातला होता. त्यामुळे या गावातील घरांचे मोठे नुकसान झाले, तसंच अनेकांचे संसार उध्वस्त झाले. आता हळूहळू पूर ओसरत चालला आहे. या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे आल्या. त्याचसोबत चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला. त्यापाठोपाठ आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र' पुरस्कार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मंगळवारी ट्विट करत पूरग्रस्तांना मदत केली असल्याची सांगितले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'भारतातील अनेक राज्यांना पूराचा फटका बसला आहे. मात्र आता हळूहळू पूर ओसरत चालला आहे. सध्या या पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. मी त्यांना मदत केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमार्फत मी मदत केली आहे' असे सांगत पूरग्रस्तांसाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन त्याने केले आहे.

हरयाणामध्ये गोळ्या झाडून पोलिस उपायुक्तांची आत्महत्या

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने पूरग्रस्तांना मदत केली असल्याची माहिती दिली. त्याने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशावेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे. आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.' असे आवाहन अजिंक्यने केले आहे. 

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी