पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून सचिनने घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

सचिन तेंडुलकर

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या सदिच्छा भेटीमध्ये दिग्गज क्रिकेटर्संनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली याची चर्चा रंगत असताना सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांसमोर त्याच्या सुरक्षिततेबाबतचा मुद्दा उपस्थित केल्याचे वृत्त आहे. सचिन तेंडुलकराला सध्याच्या घडीला राज्य सरकारकडून जी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे त्यामध्ये बदल करण्यात येणार असून त्याला वेगळ्या श्रेणीतील सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पोलिस प्रशासनाने सचिनला दिल्याचेही समजते. 

लिटल मास्टर अन् मास्टर ब्लास्टर यांनी घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, सचिनला सध्या 'एक्स' श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तिला दिली जाणारी सुरक्षा कायम स्वरुपाची नसते. वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन सुरक्षेची श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्य पोलिस प्रशासनाकडे असतो. त्यानुसार सचिनच्या सुरक्षिततेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ही सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंती सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते.  

CAA हिंसक आंदोलनावर ज्वालाने व्यक्त केल्या मनातील भावना

एक्स श्रेणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये दोन सुरक्षा रक्षक असतात. हे दोन्ही सुरक्षा रक्षक हे राज्य पोलिस दलातील असतात. काही राज्यात आमदारांना किंवा खासदारांना ही सुरक्षा दिली जाते. यापूर्वी सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती नियुक्त खासदाराच्या रुपात राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याच्या श्रेणीमध्ये बदल होऊ शकतो. पण सचिन हा केवळ भारताचा महान क्रिकेटपटू नाही तर त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तिपैकी सचिन एक आहे. त्यामुळे सचिनच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.