पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश

सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 'क्रिकेटचा देव' या नावाने प्रसिद्ध असलेल्या तेंडुलकरचा दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारा ४६ वर्षीय सचिन तेंडुलकर हा सहावा भारतीय ठरला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये राहुल द्रविडला हा सन्मान मिळाला होता.

'या' टीमवर आयसीसीने घातली बंदी

हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे, तेंडुलकरने लंडनमध्ये आयोजित समारोहात म्हटले. फलंदाजीतील असा एकही विक्रम नाही, जो सचिनच्या नावाने नोंद नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वधिक शतकं, सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. त्याने २०० कसोटीत ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५१ शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर सचिनने वनडेत ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहोत. यामध्ये ४९ शतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं करणारा तेंडुलकर जगातील एकमेव फलंदाज आहे. 

२०१५ मध्ये अनिल कुंबळेला हा सन्मान मिळाला होता. बिशनसिंग बेदी आणि सुनील गावसकर यांचा २००९ मध्ये सुरुवातीच्या 'आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश केला होता. कपिल देवला २०१० मध्ये हा सन्मान मिळाला होता. सचिन आणि डोनाल्डसह दोन वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटची सदस्य कॅथरिन फिट्जपॅट्रिकचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हॉल ऑफ फेममध्ये सहभागी होणाऱ्या एकूण खेळाडुंची संख्या ही ९० झाली आहे. क्रिकेट इतिहासातील मोजक्या अव्वल वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या ५२ वर्षीय डोनाल्डने आपल्या कारकीर्दीत ३३० कसोटी विकेट घेतल्या तर वनडेमध्ये २७२ विकेट घेतल्या आहेत.