पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनला क्रिकेटमधला महत्त्वपूर्ण सल्ला देणारा हॉटेल वेटर अखेर सापडला

सचिन तेंडुलकरला सल्ला देणारा त्याचा जबरा फॅन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याच्या भेटीसाठी आतूर झालाय. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चेन्नई येथील कसोटीमध्ये सचिनने ज्या १२६ धांवाची खेळी केली होती. त्या खेळीत या कर्मचाऱ्याचा सल्ला सचिनसाठी फायदेशीर ठरला होता.  

Video : हेटमायरचा सुपरहिट सिक्स, विराटही झाला अवाक्

सचिन तेंडुलकरने ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. हॉटेललमधील एका कर्मचाऱ्याने तुमचा मोठा फॅन असल्याचे सांगत एल्बो गार्डसह फलंदाजी करत असताना सचिनच्या बॅटचा स्विंग बदलतो, असे सांगितले होते. जगातील तो पहिला व्यक्ती आहे ज्याने माझ्यातील ही उणीव शोधली होती, असा उल्लेखही सचिनने या व्हिडिओमध्ये केलाय. त्याच्या सल्ल्यानंतर एल्बो गार्डची डिझाईन बदलल्याचे सचिनने म्हटले होते. सध्या तो कुठे असतो माहित नाही पण त्याला भेटायची इच्छा आहे, असे तेंडुलकरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते.

INDvsWI : पहिलं अर्धशतक पंतसाठी दिलासा देणार ठरेल

सचिनच्या या व्हिडिओनंतर ताज हॉटेलने सचिनच्या त्या जबऱ्या फॅनला शोधले आहे. हॉटेल ताजने ट्वीटच्या माध्यमातून सचिनचे आभारही मानले आहेत. आमच्या स्टाफ सदस्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला त्या कर्मचाऱ्याचा अभिमान असून त्याने आमच्या हॉटेलची संस्कृती जपली आहे. लवकरच तुमची भेट घडवून आणू, असे ट्विट करण्यात आले आहे.