पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन, लाराची फटकेबाजी पुन्हा पाहायला मिळणार

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विंडीजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा पुन्हा एकदा मैदानात फटकेबाजी करताना दिसणार आहे. फक्त सचिन, लाराच नव्हे तर भारताचा माजी आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, मुथय्या मुरलीधरन, ब्रेट ली, जॉन्टी ऱ्हॉड्स आणि शिव नारायण चंद्रपॉल हे दिग्गजही पुन्हा एकदा मैदानात उतरतील.

प्रो-कबड्डीची दंगल! चार संघ फायनल गाठण्यासाठी घेणार 'पंगा' 

आगामी वर्षातील फेब्रुवारीमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेत पाच देशातील दिग्गज क्रिकेटर वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या रस्ते बांधकाम विभागाच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षे ही स्पर्धा खेळवण्याचा मानस आहे.

फेडररचं ऑलिम्पिंकमध्ये खेळण्याबाबत ठरलं!

२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान पहिल्या हंगामातील सामने भारतातील वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येतील. २०१३ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर तिसऱ्यांदा सचिन क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये एमसीसीकडून रेस्ट ऑफ वर्ल्डच्या विरुद्ध खेळताना दिसला होता. त्यानंतर सचिनने २०१५ मध्ये अमेरिकेत आयोजित तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळल्याचे पाहायला मिळाले होते.