पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनला शुभेच्छा देताना सेहवागने कोरोना लढ्यासंदर्भात दिला खास संदेश

सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून दोन खास फोटो शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या आपल्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनला शुभेच्छा देताना सेहवागने कोरोनाविरोधातील लढ्यासंदर्भात संदेशही दिलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४७ वा वाढदिवस आहे. २४  एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या सचिनने क्रिकेटच्या मैदानात आपली विशेष छटा उमटवली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनला शुभेच्छा देत असताना सेहवागने दोन फोटो शेअर केले आहेत.

पत्नीच्या काळजीपोटी त्याने आयपीएलमधून माघार घेतली

एक फोटो हा २००७ च्या विश्वचषक स्पर्धेवेळीचा आहे तर दुसरा फोटो हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा आहे. या फोटोसह सेहवागने क्रिकेट चाहत्यांसाठी एक संदेशही दिला आहे. त्याने लिहिलंय की, जेव्हा सचिन फलंदाजी करायचा तेव्हा भारत स्तब्ध व्हायचा. या दोन फोटोमध्ये पाजींकडून (सचिन तेंडुलकर) एक खास गोष्ट शिकायला मिळाली. कठिण संकटानंतर विजय शक्य असतो! हीच या फोटोमागची कहानी आहे. सध्याच्या घडीला ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, असे म्हणत कोरोनाविरोधातील सामना निश्चित जिंकू, असा विश्वास सेहवागने व्यक्त केलाय. 

आम्ही संघासाठी तर भारतीय खेळाडू स्वत:साठी खेळायचे'

२००७  च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला होता. यावेळी आपल्या सहकाऱ्यांसोबत सचिन हताशपणे बसलेला फोटो सेहवागने शेअर केलाय. दुसऱ्या फोटोत २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील विजयानंतर सचिन सहकाऱ्यांसोबत विजयाचं सिलेब्रेशन करताना पाहायला मिळते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. सेहवागसह अन्य दिग्गज क्रिकेटर्स आणि मान्यवर आणि क्रिटचा चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sachin Tendulkar Birthday here is how virender sehwag wished him happy birthday Sachin tendulkar 47th bday