मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बुधवारी मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी ट्विटर इंडियाला विनंती केली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून संदर्भात एक ट्विट केले आहे. अर्जुन तेंडुलकरच्या फेक ट्विटर अकाउंटसंदर्भात ट्विटर इंडियाने कारवाई करावी, अशी मागणी सचिनने केली आहे.
INDvsWI T20 Series 'गब्बर'च्या दुखापतीनंतर संजूला मिळाला 'न्याय
एवढेच नाही तर सारा आणि अर्जुन दोन्ही मुले ट्विटरवर नाहीत, असा उल्लेखही त्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. अर्जुन तेंदुलकरच्या नावे एक ट्विटर हँडेल आहे. या अकाउंटवरुन काही विचित्र पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सचिनने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
...तरच टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनीही खेळताना दिसेल
तेंडुलकरने ट्विटमध्ये लिहलंय की, मी ही गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की, अर्जुन आणि सारा ट्विटरवर नाहीत. @jr_tendulkar या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून काही चुकीच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. मी @TwitterIndia ला विनंती करतो की याप्रकरणात लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी. आपल्या मुलांच्या सोशल अकाउंट संदर्भात स्पष्टीकरण देण्याची सचिनची ही पहिली वेळ नाही. ट्विटर इंडियाने तेंडुलकरच्या ट्विटची तात्काळ दखल घेत अर्जुन तेंडुलकरच्या नावाचे फेक अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.