पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वतःचे केस कापत असल्याचा सचिन तेंडुलकरचा फोटो चर्चेत!

सचिन तेंडुलकर घरामध्ये आरशात बघत स्वतःच आपले केस कापत असल्याचा हा फोटो आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मुंबईमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक भाग सील करण्यात आले आहेत. अशा स्थितीत सध्या अनेक सेलिब्रिटी, क्रीडापटू आपापल्या घरातच राहात आहेत. माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू

सचिन तेंडुलकर घरामध्ये आरशात बघत स्वतःच आपले केस कापत असल्याचा हा फोटो आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे की, स्क्वेअर कट खेळण्यापासून ते स्वतःचे हेअर कट करण्यापर्यंत मी आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा कायमच आनंद घेतला. माझा हा नवा हेअर कट कसा दिसतोय, असा प्रश्नही त्याने युजर्सना विचारला आहे. 

पालघर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देणार - मुख्यमंत्री

सध्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटू घरातील काम करीत असल्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करताहेत. प्रत्येकाने आपल्या चाहत्यांना आणि देशातील नागरिकांना घरातच थांबण्याचे आणि सरकारच्या सर्व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.