पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन-लक्ष्मण १४ तारखेला BCCI लवादासमोर हजर होणार

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर

भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणात दोन्ही दिग्गजांना १४ मे ला लवादा समोर हजर राहावे लागणार आहे. या दोघांशिवाय तक्रारदार आणि मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय गुप्ता आणि बीसीसीआय प्रशासकीय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार आहे.  

सचिन म्हणतो मी लाभार्थी नाही!

सल्लागार समितीचे सदस्य असताना सचिन आणि लक्ष्मण आयपीएलमधील संघासोबत कार्यरत असल्याचे सांगत संजीव गुप्ता यांनी या दोघांवर हिससंबंध प्रकरणातील तक्रार दाखल केली होती. दोन्ही क्रिकेटर्सनी हा आरोप फेटाळून लावला होता. या परिस्थितीला बीसीसीआय जबाबदार असल्याचा आरोप सचिनने केला होता. तसेच ‘बीसीसीआय’च्या घटनेतील ३८(३) कलमानुसार, ‘नियंत्रित श्रेणी’तील वाद हा वैयक्तिक स्तरावर हाताळण्याजोगा किंवा त्या व्यक्तीने हितसंबंधांची पूर्ण माहिती दिल्यास तोडगा निघणारा आहे, असेही सचिनने म्हटले आहे.

'सचिन, सौरव, लक्ष्मण या त्रिकुटाला विनाकारण लक्ष्य केलंय'

लवादाच्या नोटीसीला प्रत्युत्तर देताना लक्ष्मणने विनोद रॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय समितीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. लक्ष्मण म्हणाला होता की, सल्लागार समितीच्या सदस्यांचा सल्ला हा केवळ वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक निवडीवेळी घेतला जातो. आमची विस्तारित भूमिका अस्पष्ट अशीच आहे.