पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐतिहासिक कसोटीसाठी PM मोदींसह सचिनही उपस्थित राहणार?

नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर

भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी बऱ्याच दिवसांपासून नुसताच चर्चेत असलेल्या डे नाइट कसोटीचा मुद्दा निकाली काढला. कोलकाताच्या मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा दिवस रात्र खेळवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी प्रमुख मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यापूर्वी गांगुली यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. 

चक दे इंडिया! भारतीय महिलांसमोर अमेरिकन महिला हतबल

त्यानंतर आता सामन्यासाठी अन्य मान्यवरांच्या नावांची चर्चा जोर धरू लागली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामन्यासाठी उपस्थितीत राहतील, यासंदर्भात बीसीसआयचे प्रयत्न सुरु आहेत. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, कोलकातामध्ये रंगणाऱ्या दिवस रात्रीच्या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवले आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवण्यात आल्याचे गांगुली यांनी म्हटले आहे.

दुखापतीतून रोहित शर्मा फिट है बॉस!

याशिवाय पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून बांगलादेशकडून २००० मध्ये पहिला कसोटी सामन्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्रा, मेरी कोम, पीव्ही सिंधू यांना देखील कोलकाताच्या मैदानावर सन्मानित करण्यात येणार आहे.  

टी-२० मालिकेत वॉर्नरला बाद करणं लंकेला जमलं नाही

भारताच्या कसोटी इतिहासातील पहिला दिवस-रात्र सामन्यात कोणतीही कमी राहू नये, यासाठी सौरव गांगुली अधिकाधिक नव्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा सामना स्मरणीय रहावा यासाठी दादा खुद्द मेहनत घेत असल्याची माहिती एका बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.