पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेन स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, इंग्लंडचे टेन्शन वाढले

बेन स्टोक्स

इंग्लंडच्या संघाला विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना जोहन्सबर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बेन स्टोक्स आपल्या वडिलांसोबत रुग्णालयातच आहे.  वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बेन स्टोक्स मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. 

BLOG : पंतच्या प्रेमापोटी बीसीसीआयचा नवा प्रयोग

इंग्लंडचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या मैदानातून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सलामीचा कसोटी सामना रंगणार आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने बेन स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती चिंताजन असल्याची माहिती दिली आहे. स्टोक्सचे वडील जेक हे न्यूझीलंडचे माजी रग्बी खेळाडू आहेत. वडील आजारी असल्यामुळे कदाचित बेन स्टोक्सला पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागू शकते.  

...म्हणून सचिनने घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

इंग्लंड आणि वेल्सने परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, वडील आजारी असल्यामुळे स्टोक्सने सराव सत्रात भाग घेतलेला नाही. तो वडिलांसोबत रुग्णालयात आहे. स्टोक्सने यंदाच्या वर्षीचा पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी मायदेशात पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत स्टोक्सने लक्षवेधी कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात त्याने न्यूझीलंडच्या तोंडातील घास हिसकावून घेत मर्यादित षटकात विश्वचषक उंचावण्याचे इंग्लंडचे स्वप्न पूर्ण केले होते.  

CAA हिंसक आंदोलनावर ज्वालाने व्यक्त केल्या मनातील भावना

स्टोक्स सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशिवाय मैदानात उतरणे इंग्लंडसाठी धोक्याची घंटाच आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ड ब्रॉड यांनी देखील प्रकृती अस्वस्थेमुळे सराव सामन्यात भाग घेतला नव्हता. एकंदरित सध्याच्या घडीला इंग्लंडच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sa vs eng test series 1st test match at SuperSport Park Centurion ben stokes a doubt for centurion test after fater taken ill south africa vs england