पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जलदगती गोलंदाजाचा पराक्रम! सचिन-द्रविड या दिग्गजांच्या पक्तींत स्थान

जेम्स अँड्रसन

सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या इंग्लंडला १०७ धावांनी पराभूत केलं. इंग्लंडचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला असला तरी हा सामना जेम्स अँडरसनसाठी खास आणि महत्त्वपूर्ण ठरला. दुखापतीतून सावरणाऱ्या अँडरसनने १५० वा कसोटी सामना खेळला. दिडशे कसोटी सामन्यांचा टप्पा पार करणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरलाय. 

MSD च्या भविष्यावर 'जम्बो' रिअ‍ॅक्शन

क्रिकेट जगतात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. सचिन तेंडुलकरने कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग आणि स्टिव वॉ यांनी प्रत्येकी १६८, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १६६, शिवनारायण चंद्रपाल आणि राहुल द्रविड यांनी प्रत्येकी १६४, अ‍ॅलेस्टर कूक १६१, अ‍ॅलन बॉर्डर १५६ या आठ खेळाडूंनंतर या दिग्गजांच्या यादीत अँड्रसनची वर्णी लागली आहे. इंग्लंडकडून दीडशे कसोटी खेळणारा तो दुसरा खेळाडू आहे. 

रवी शास्त्रीचा शाहरुख-रविनासोबत नवीन वर्षाचा जल्लोष

दक्षिण अफ्रीकेविरुद्धच्या खास सामन्यात अँड्रसनने पहिल्याच चेंडूवर डीन एल्गरला तंबूचा रस्ता दाखवला. कसोटी मालिकेच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा एल्गर हा नववा खेळाडू ठरला.  एल्गरच्या पूर्वी इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ आणि स्टॅन वर्थिंगटन, दक्षिण अफ्रीकेचा जिमी कूक, बांग्लादेशचा हनान सरकार, भारताचा वासीम जाफर, न्यूजीलंडचा टिम मॅकिनटोश आणि भारतचा के केएल राहुल मालिकेतील पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन्ही डावात मिळून अँड्रसनला केवळ दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेनं पाहुण्या इंग्लंडला १०७ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sa vs eng 1st test match south africa vs england james anderson became first ever fast bowler to play 150 test matches