पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादू मामा : तांबड्या मातीतील रांगडा पैलवान

दादू मामांच्या कुस्त्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या असायच्या

रुस्तम हिंद केसरी आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान दादू मामा चौगुले यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  कुस्तीच्या पंढरीत (कोल्हापूर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पैलवान दादू (मामा) चौगुले यांनी वयाच्या सातव्या वर्षी कुस्तीचा श्रीगणेशा राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावच्या तालमीतून  केला. मामांनी वयाच्या दहाव्या वर्षी मोतीबाग तालमीत प्रवेश घेतला.

कुस्तीच्या पंढरीत शोककळा! रुस्तम-ए-हिंद पैलवान दादू चौगुले यांचे निधन

पैलवान दादू चौगुले

ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाकाय शरीरयष्टीचा मल्ल अनेक मैदाने गाजवू लागला. पैलवान बाळू बिरे वस्ताद आणि आंदळकर वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, केसरी, रुस्तम हिंद केसरी, महान भारत केसरी या मोठया स्पर्धा त्यांनी गाजविल्या. राष्ट्रकुल सारख्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही आपल्या कुस्तीची चुणूक दाखवत देशाला रौप्यपदक मिळवून दिले. मामांनी (दादा चौगुले) पैलवान सादिक पंजाबी, सतपाल यासारख्या नामवंत मल्लांबरोबर लढलेल्या कुस्त्या लोकांच्या आजही स्मरणात आहेत.

पीओकेतील भारतीय लष्कराच्या कारवाईवर संरक्षण मंत्र्यांची नजर

त्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी देखील दादू मामांच्या कुस्तीचे कौतुक केले होते. चांगला कुस्तीपट्टू म्हणून नाव कमावले नंतर आयुष्यातील दुसरे पर्व मोतीबाग तालमीतील मल्लाना मल्लविद्याचे धडे दयायला सुरुवात केले. पारंपरिक कुस्तीतील डावा बरोबर आधुनिकतेची जोड देत गेल्या अनेक दशकापासून ते कुस्तीचे प्रशिक्षण देत होते. महाराष्ट्र केसरी समाधान घोडके सारखे अनेक मल्ल त्यांनी घडविले आहेत. तसेच आपल्या अमोल आणि विनोद या दोन मुलांनाही चांगले पैलवान बनवले. दादू मामांचा मोठा मुलगा विनोद चौगुले याने महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी होण्याचा मान मिळवलाय. 

पैलवान दादू मामांच्या कुस्तीमधील दैदिप्यमान कामगिरी आणि अल्पपरिचय  
जन्मभूमी- अर्जुनवाडा, ता-राधानगरी, जिल्हा-कोल्हापूर
तालीम- मोतीबाग
वस्ताद- बाळू बिरे आणि गणपतराव आंदळकर वस्ताद

#कुस्ती मधील दैप्तीमान कारकीर्द

- डबल महाराष्ट्र केसरी- १९७० आणि १९७१  
१९७० मध्ये  पुणे अधिवेशन (विजेतेपद)
१९७१- अलिबाग अधिवेशन (विजेतेपद)

# रुस्तम हिंद केसरी-१९७३
३ मार्च १९७३ रोजी मुंबई येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ते 'रुस्तम हिंद केसरी'चे मानकरी 
-महान भारत केसरी- १९७१
३ एप्रिल १९७३ रोजी दिल्ली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महान भारत केसरीचे मानकरी 

#राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक-
- १९७४ साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाचे मानकरी 
- २८ डिसेंबर १९७६ रोजी बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक

#पुरस्कार 

# शिवछत्रपती पुरस्कार विजेते :
-१९७४ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून दादू मामा चौगुले यांना शिवछत्रपती पुरस्कार दौवून गौरविण्यात आले.
-जीवनगौरव ध्यानचंद पुरस्कार :
महान हॉकीपटू ध्यानचंद सिंग यांच्या नावावरून देण्यात येणारा जीवनगौरव ध्यानचंद पुरस्काराने दादू मामांना सन्मानित करण्यात आले होते.

पै.गणेश मानुगडे (कुस्ती मल्लविद्या)
   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rustum e hind dadu chougule pass away read early life and achievements of wrestler in akkhada blog written by wrestler Ganesh Manugade