पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RCB च्या स्टाफमध्ये महिला मसाज थेरेपिस्टचा समावेश

विराट कोहली (संग्रहित छायाचित्र)

आगामी आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर बंगळुरुच्या संघात काही अमुलाग्र बदल पाहायला मिळणार आहेत. यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे संघाने आपल्या सहाय्यक स्टाफमध्ये महिलेला संधी दिली आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात बंगळुरुच्या संघासोबत सहाय्यक स्टाफमध्ये नवनीता गौतम यांची मसाज थेरेपिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मेरी कोमशी लढू द्या! भारतीय महिला बॉक्सरचे क्रीडा मंत्र्यांना पत्र

एखाद्या महिलेची सहाय्यक स्टाफपदी नियुक्ती करणारा बंगळुरु रॉयल्स हा आयपीएलमधील पहिला संघ आहे. नवनीता मुख्य फिजिओथेरिपिस्ट ईव्हान स्पीची आणि प्रशिक्षक शंकर बासू यांच्यासोबत काम करणार आहेत. नवनीता यांच्या नियुक्तीवर संघाचे संचालक संजीव चुडीवाला म्हणाले की, क्रिकेटच्या मैदानातील या ऐतिहासिक निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे. हा निर्णय योग्य दिशेने टाकलेले मोठे पाऊल असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. खेळांमध्ये लोकांना सक्षम करण्याची ताकद असते. यामध्ये समानतेची भावना निर्माण करण्यासाठी असे निर्णय महत्त्वपू्ण ठरतील. 

मेस्सीचा आणखी एक पराक्रम, हॅटट्रिकसह पुरस्काराचा षटकार

मागील आयपीएल स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स संघाने निराशजनक कामगिरी केली होती. १४ पैकी त्यांना केवळ ५ सामन्यात विजय मिळवता आला होता. गुणतालिकेत हा संघ तळाला राहिला होता. यंदाच्या स्पर्धेत हा संघ पुन्हा लयीत दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.