पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Cup : भारताविरुद्धचा सराव सामना फायदेशीर ठरेल : रॉस टेलर

रॉस टेलर

न्यूझीलँडचा मध्यफळीतील फलंदाज रोस टेलरने सराव सामन्यात भारताविरुद्ध खेळणे फायदेशीर ठरेल, असे म्हटले आहे. इंग्लंड आणि वेल्समधील विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारत आणि न्यूझीलँड हे दोन्ही २५ मे रोजी एकमेकांविरुद्ध सराव सामना खेळणार आहेत. त्यानंतर न्यूझीलँड २८ मे रोजी वेस्ट इंडिजविरुध्द दुसरा सराव सामना खेळणार आहे.या दोन सराव सामन्यानंतर ३० मे रोजी न्यूझीलँड श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल.   

बड्या मोहिमेला जाण्यापूर्वी शास्त्री धोनीबद्दलही भरभरुन बोलले
 

आयसीसीच्या वृत्तानुसार टेलर म्हणाला की,  ''भारताविरुद्धच्या सराव सामन्यामुळे आमची चांगली तयारी होईल. विश्वचषकात भारतीय संघ हा अधिक मजबूत आहे. ते विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध चांगली कामगिरी केल्यास आमच्या संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल.

World Cup 2019 : यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक : विराट कोहली 

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले असून रॉबीन राउंड पद्धतीमुळे प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. त्यामुळे भारताचा न्यूझीलँडविरुद्धचा सामना ही फिक्स आहे. त्यापूर्वी हे दोन संघ सराव सामन्याच्या निमित्ताने एकमेकांसमोर भिडतील.