पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी

रोहित शर्मा

आयसीसी विश्वचषकात (ICC World Cup 2019) भारताचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपुष्टात आला होता. न्यूझीलंडने पावसामुळे दोन दिवस चाललेल्या या सेमीफायनल सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे लॉर्डसवर विश्वचषक उंचावण्याचे भारताचे स्वप्न तिथेच भंगले होते. भलेही भारताला विश्वचषक पटकावता आला नसला तरी उपकर्णधार रोहित शर्माने 'गोल्डन बॅट' आपल्या नावे केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क हा 'गोल्डन बॉल'चा मानकरी ठरला आहे.

भारतीय उपकर्णधाराने ९ सामन्यात ६४८ धावा बनवल्या. जो रुट, जॉन बेअरेस्टो आणि जेसन रॉय हे त्याच्या मागे होते. केन विल्यम्सनला ही रोहितला मागे टाकणे जमले नाही. रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या फायनलमध्ये किवी कर्णधाराने ५३ चेंडूत ३० धावा केल्या आणि ५७८ धावांसह मालिका संपुष्टात आली.

भारत फायनलमध्ये नसल्यानं स्टार स्पोर्ट्सला कोट्यवधींचा फटका

रोहित शर्माला मागे टाकण्याची तीन इतर फलंदाजांकडे संधी होती. जो रुटने ३० चेंडूत ७, जेसन रॉयने २० चेंडूवर १७ आणि जॉनी बेअरस्टोने ५५ चेंडूत ३६ धावा बनवल्या. जो रुट आणि केन विल्यम्सनला क्रमशः ९९ आणि १०० धावांची गरज होती. जर त्यांनी या धावा केल्या असत्या तर रोहित शर्माला मागे टाकण्यात त्यांना यश आले असते.

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ६४७, बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन ६०६ धावा कर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर विल्यम्सन, जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि अॅरोन फिंच यांचा क्रम येतो.

पाकिस्तानच्या बाबर आझमने ४७४ धावा आणि भारताचा कर्णधर कोहलीने ४४२ धावा केल्या. पण एकालाही सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा (६७३) विक्रम मोडता आला नाही. सचिनने २००३ मध्ये या धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मॅथ्यू हेडनचा क्रमांक येतो. त्याने २००७ मध्ये ६५९ धावा केल्या होत्या.

#ENGvNZ : ऐतिहासिक! सुपर ओव्हरमध्येही टाय, यजमान इंग्लंड विश्वविजेता

मिशेल स्टार्क 'गोल्डन बॉल'चा मानकरी

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने २७ विकेट घेत 'गोल्डन बॉल'चा मानकरी ठरला. त्याने केवळ १० सामन्यात दोन वेळा ४-४ आणि दोन वेळ ५-५ विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (२०), बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान (२०), न्यूझीलंडचा फर्ग्यूसन (१९), भारताचा जसप्रीत बुमराह (१८), इंग्लंडचा मार्क वुड (१८), न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (१७), पाकिस्तानचा मोहम्मद अमीर (१७), शाहीन आफ्रिदी (१६) आणि इंग्लंडचा ख्रिस वोक्स (१६) यांचा क्रमांक येतो.