पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितनं विराटनंतर अनुष्कालाही केलं अनफॉलो!

रोहित शर्मा आणि अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काहीना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत असते. अनुष्का चित्रपटानंतर आता वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही चर्चा रंगत असतानाच आता ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. 

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अनुष्काला अनफॉलो केल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. विश्वचषकातील सेमीफायनलमधील पराभवानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याची वृत्त पसरले होते. बीसीसीआयने अफवा असल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्मा आणि रोहित शर्मा यांच्यात सोशल मीडियात दरी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्माने यापूर्वी विराट कोहलीला देखील अनफॉलो केलं आहे. 

Japan Open 2019: सिंधू-प्रणीतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

विशेष म्हणजे रोहितच्या इन्टामध्ये  विराट-अनुष्का जोडीला स्थान नसले तरी कोहलीच्या लिस्टमध्ये रोहित-रितिका जोडी आहे. कोहली आजही रोहित-रितिका जोडीला फॉलो करतो. रोहितनं या जोडीला फॉलो करत होता का? आणि जर करत असेल तर त्याने अनफॉलो का केलं? याच उत्तर रोहितलाच माहिती असेल.