पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया

रोहित शर्मा

विश्वचषकात विक्रमी ५ शतके ठोकणाऱ्या भारतीय टीमचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर भावूक टि्वट केले आहे. टीमला जेव्हा गरज होती त्यावेळी आम्ही चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरल्याचे त्याने मान्य केले आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला आहे. भारताच्या पराभवामुळे देश-विदेशातील चाहते नाराज झाले आहेत. त्यातच रोहितने आपले दुःख सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपले मन जड झाल्याचे त्याने म्हटले आहे. 

विशेष म्हणजे, भारताचे आघाडीचे तीन फलंदाज के एल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १-१ धावा काढून बाद झाले. एखाद्या टीममधील पहिले तीन फलंदाज १-१ धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साखळी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे फलंदाज बाद फेरीतील पहिल्याच सामन्याचे आव्हान पेलण्यात अपयशी ठरले.

त्यामुळे २४० धावांचा पाठलाग करणे टीम इंडियाला जमले नाही. एकवेळ भारताच्या ५ धावांवर ३ विकेट गेल्या होत्या. महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजाचा डाव सावरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 

रोहितने आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, 'महत्त्वाच्या क्षणी टीम म्हणून आम्ही कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. ३० मिनिटांच्या खराब क्रिकेटमुळे ट्रॉफी जिंकण्याची आमची चांगली संधी हिरावली गेली. माझे मन जड झाले आहे आणि तुमचीही तीच स्थिती आहे, याची मला कल्पना आहे.'

क्रिकेटच्या 'पंढरीत' इंग्लंड-न्यूझीलंड पूर्ण करणार वर्ल्ड कपचं 'रिंगण'

आपल्या चाहत्यांचे आभार मानताना रोहित म्हणाला की, घरापासून दूर तुम्हा सर्वांचा मोठा पाठिंबा मिळाला. इंग्लंडमध्ये जेथेही आम्ही खेळलो. ते प्रत्येक मैदान निळ्या रंगाने रंगवल्यामुळे मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. 

तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीनेही सुरुवातीच्या ४५ मिनिटांच्या खराब खेळामुळे भारताचा पराभव झाल्याचे म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rohit Sharma tweet an emotional message after new zealand beat india in world cup semi final