पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Live चॅटमध्ये रोहितकडून पंत ट्रोल

रोहित शर्मा आणि ऋषभ पंत

कोविड-१९ च्या संकटामुळे विविध खेळ स्पर्धेला ब्रेक लागला आहे. अति क्रिकेट खेळण्याबाबत चर्चेत असणारे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या सक्तीच्या विश्रांतीवर आहेत.  'लॉकडाउन'मुळे खेळाडूंना सरावही बंद खोलीतच करावा लागत आहे. दरम्यान क्रिकेटर्स इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटच्या माध्यमातून जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी दोघांनी मिळून युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

तिरस्काराचा व्हायरस पसरवू नका, भज्जीने नेटकऱ्यांना लगावली चपराक

बुमराह रोहितला म्हणाला की, पंतला तुझ्याविरुद्ध उत्तुंग फटकेबाजी करण्याची शर्यत लावायची आहे. यावर रोहितने पंतला अजून खूप शिकायचे आहे, असे म्हटले. क्रिकेट खेळायला सुरुवात करुन केवळ एक वर्ष झाले आहे. त्याला म्हणाव माझ्यासोबत स्पर्धा करण्याचा विचारही करु नको. कोरोना विषाणूच्या संकटामुळे आगामी आयपीएल स्पर्धा  संकटात सापडली आहे. मार्चमध्ये सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेटर मजुरांच्‍या मदतीला धावला, पाहा व्हिडिओ

यापुढे देखील स्पर्धा होईल किंवा नाही याबाबतचा संभ्रम कायम असून जर स्पर्धा रद्द झाली तर खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी रोहित शर्माने देशावर ओढावलेल्या संकटापेक्षा आयपीएल स्पर्धा महत्त्वाची नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. क्रिकेट स्पर्धेशिवाय युरोपातील लोकप्रिय फुटबॉल लीगची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. जगातील मानाची स्पर्धा असणाऱ्या ऑलिम्पिकने पुढील वर्षी स्पर्धा खेळवण्याची जाहीर केले. टेनिस कोर्टवरील विम्बल्डन स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.