पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम

रोहित शर्मा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने आयसीसीच्या क्रमवारीतही विक्रमाला गवसणी घातली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा रोहित शर्मा तीसरा भारतीय ठरला. रोहितपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीरने असा पराक्रम नोंदवला होता. रांची कसोटीमध्ये रोहित शर्माने २१२ धावांची दमदार खेळी करत आयसीसी क्रमवारीत १२ व्या स्थानावरुन १० व्या स्थानावर झेप घेतली आहे.  

ballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट पाचव्या रँकिगवर पोहचला आहे. त्याने रांची कसोटीत ११५ धावांची खेळी करत कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले होते.   सामनावीरचा पुरस्कार पटकावेला रोहित शर्मा आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ४४ व्या स्थानावर होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत दुसरे तर  नोव्हेबर २०१८ मध्ये टी-२० मध्ये आठव्या स्थानावर मजल मारली होती.   

BCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...

उल्लेखनिय आहे की, विराट कोहली क्रिकेच्या तिन्ही प्रकारात अव्वलस्थानी पोहचलेला फलंदाज आहे. तर विद्यमान खासदार आणि माजी क्रिकेटर गंभीर  कसोटीमध्ये अव्वलस्थानी तर एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आठव्या स्थानावर राहिला आहे.